पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्स जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, हे चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण १२ कर्मचारी या टेम्पोत होते. हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली.
(बातमी अपडेट होत आहे)





















Join Our Whatsapp Group