दरम्यान, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडी मधील ती घटना अपघात नसल्याचे समोर आले आहे. ही आग अपघाताने नव्हे, तर चालकाकडून हेतुपरस्सर आग लावली होती. या घटनेत स्वत: चालकाने ज्वलनशील केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी माहिती समोर आली आहे.
चालकाचा दिवाळीत पगार कापला होता. तसेच गाडीतील सह कर्मचारी यांनी त्याला त्रास दिला होता. त्यामुळेच चालकानं, सूडबुद्धीने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासातून उघडकीस आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. तिघांशी वाद होता त्यांना मारायचं म्हणून त्याने हा प्रकार केला. पण या घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत शंकर शिंदे, गुरुदास लोखरे, सुभाष भोसले आणि राजन चव्हाण यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला आहे.






















Join Our Whatsapp Group