पिंपरी (Pclive7.com):- औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे अतिशय उत्साहात संपन्न झाले. रविवार दि.२३ मार्च रोजी संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनात तत्कालीन शिक्षकांसह विविध ट्रेडचे शिक्षण पूर्ण केलेले सुमारे १०४ माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभागी झाले होते.

सकाळपासून सायंकाळ पर्यन्त चाललेल्या या कार्यक्रमात उपस्थित तत्कालीन शिक्षक विठ्ठल सस्ते, दीपक जगताप रामभाऊ पिसे, माजी विद्यार्थी प्रतिनिधी निवेदक किशोर केदारी, सुरेन्द्र रानवडे, संजय हांडे तसेच अन्य विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुणे ते कन्याकुमारी दरम्यान सायकल प्रवास करणारे विकास भोर, 96 दिवसांत पायी प्रवास करून नर्मदा परीक्रमा पूर्ण करणारे ज्येष्ठ पत्रकार सदाशिव अमराळे ,रोटरी क्लबच्या निर्मला नलlवडे, सोसायटी महासंघाच्या अध्यक्षपदी नव्याने निवड झालेले नवनाथ नलावडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दरम्यान बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध गुणदर्शन या सदरात कथा, कविता, हास्य-विनोद, गीत गायन, नृत्य सादर केले. या संमेलनात सुमारे 30-35 वर्षानंतर काही विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. एक दुसर्यांची विचारपूस करताना व छायाचित्र काढताना सगळे रमबाण व गुंग होतें.
हे संमेलन व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी नवनाथ नलlवडे, सदाशिवआमराळे, दतात्रेय वर्पे, सुदाम कुदळे, अशोक जाधव, अनिल पानसरे, सावता कुदळे, पिराजी ताम्हाणे, संजय जठार, राजेंद्र यादव, सतिश खेडकर, शारदा ठकlर, सुरेन्द्र रानवडे, राजेश हांडे किशोर केदारी, बापू लव्हे, देविका दाते आदींनी मेहनत घेतली. नवनाथ नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक संजय जठार यांनी तर आभार राजेश शिरसाठ यानी मानले.






















Join Our Whatsapp Group