पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण राज्यात युवासेना तर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘मॉक टेस्ट’ परीक्षा उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड शहर युवासेना तर्फे देखील हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहर युवासेनेच्या वतीने राबवण्यात येणारी मॉक टेस्ट परीक्षा नव महाराष्ट्र विद्यालय जुनियर कॉलेज पिंपरी वाघेरे याठिकाणी घेण्यात आली. सदर परीक्षेस शहरातील ३१० विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या ‘मॉक टेस्ट’ परीक्षेचे आयोजन पिंपरी चिंचवड युवासेना शहरप्रमुख शहरप्रमुख चेतन पवार यांनी केले होते.

या प्रसंगी शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, अशोक वाळके, अनिता तुतारे, हरीश नखाते, रूपाली आल्हाट, वैशाली कुलथे, सुजाता नखाते, रंजनी वाघ, माधव मुळे, सतिश मरळ तसेच युवासेना चिंचवड़ विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, सुमित निकाळजे, कृष्णा माने, गोविंद शिंदे, गणेश जोशी, विनायक दळवी, संदेश देसले, योगिनी मोहन, वंदना वाल्हेकर, कमल गोडांबे, तस्मीन शेख, तसेच शिवसेना, युवासेना, शिवदूत, व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.
सदरची ‘माॅक टेस्ट’ परीक्षेचे आयोजन युवासेना शहरप्रमुख पिंपरी चिंचवड शहर चेतन पवार यांनी केले होते. चेतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपशहरप्रमुख प्रविण पाटील व उपशहरप्रमुख निखील दळवी यांनी ही परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडली. तसेच नवमहाराष्ट्र विद्यालय व डॉ.संतोष पाचपुते सर यांनी विशेष सहकार्य केले.






















Join Our Whatsapp Group