पिंपरी (Pclive7.com):- अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करून सिलिंडरची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेचार वाजता काळे कॉलनी चऱ्होली येथे करण्यात आली. शशिकांत बालाजी मुळे (२४, रा. काटे कॉलनी, च-होली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिस अंमलदार बाबाजी जाधव यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शशिकांत याने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून चार किलो वजनाच्या सिलिंडरमध्ये धोकादायकरीत्या गॅस काढला. चार किलो वजनाचे सिलिंडर त्याने काळ्या बाजारात चढ्या दराने विकले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये गॅससाठा आणि इतर साहित्य असा एकूण ४६ हजार ३०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.






















Join Our Whatsapp Group