पिंपरी (Pclive7.com):- नेहरूनगर येथील झिरो बॉईज चौकात असलेल्या गादी कारखाना व फर्निचर दुकानाला भीषण आग लागली आहे. सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही लागली होती. या आगीत येथील तीन ते चार दुकाने जळून खाक झाली असून तीन महिला जखमी झाल्या आहेत.

नेहरूनगर येथील झिरो बॉईज चौकातील दुकानाला सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. घटनास्थळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दहा बंब दाखल झाले होते. आग नियंत्रणात आली असून या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

या आगीत तीन महिला जखमी झाल्या आहेत. या जखमी महिलांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.