पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. आज (दि.०३) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील विविध भागात जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात गुरुवारी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांच्या जीवाला थंडावा मिळाला आहे. पावसाच्या सरी कोसळल्यानं मातीचा छान सुगंध सगळीकडं दरवळत आहे. तसेच अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर असलेल्या लोकांची मात्र त्रेधातिरपिट उडाली. दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करुन आसरा घ्यावा लागला.

ढगांच्या गडगडाटासह पिंपरी चिंचवड शहरात सध्या पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर वीजाही चमकत आहेत, त्यामुळं या अवकाळी पावसामुळं शहरातील नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.






















Join Our Whatsapp Group