पिंपळे सौदागर (Pclive7.com):- हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या पूर्वसंध्येला समृद्धी पार्क सोसायटी पिंपळे सौदागर येथील रहिवाशांनी माता की चौकी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमाला परिसरातील ५ ते ६ सोसायटीच्या लोकांनी सहभाग घेतला होता.

माता की चौकीचे आयोजन सोसायटीचे अध्यक्ष सुशील भाटिया, सचिव विवेक अग्रवाल, सल्लागार समीर सचदेवा, आदित्य गौंड यांनी केले होते. सोसायटी सदस्यांनी माता की चौकीचा आनंद लुटला आणि हिंदू नववर्ष एकत्र साजरे केले. सदस्यांनी श्री. भाटिया यांना असे अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती केली.

यावेळी पिंपरी चिंचवड भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष माजी नगरसेवक बापू काटे यांनी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्याचा पुढाकार घेतला. आणि वैयक्तिकरित्या सहभागी होऊन माता की चौकीचा आनंद लुटला.