पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड प्रीमियर टी-ट्वेंटी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात अशा स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या खेळाडूंना व पिंपरी-चिंचवड मध्ये गेली ५ वर्षे वास्तव्य असणाऱ्या खेळाडूंनाच या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करता येईल. शहरातील तरुण, उदयोन्मुख, नवोदित खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

सदर स्पर्धा करिता खेळाडूंना रजिस्ट्रेशन (नोंदणी) करता यावे यासाठी लिंक तयार करण्यात आलेली आहे. ( https://konfub.com/Pimpri -Chinchwad-premier-league ). सदर लिंक ८ एप्रिल २०२५ पर्यंत खुली राहणार आहे. असे असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल यांनी कळविले आहे.

ही स्पर्धा प्रथम २ गटांमध्ये लीग पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धा करिता खेळाडूंचा लिलाव एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक रुपये एक लाख व चषक, दुसरे पारितोषक रुपये ७५ हजार व चषक, तिसरे पारितोषक रुपये ५० हजार व चषक असेल. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असेही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेकरिता ८ संघमालक असून या ८ संघाकरिता राजकीय, औद्योगिक, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक व क्लब चालक यांनी संघ विकत घेणे कामी असोसिएशनशी संपर्क साधावा असे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी जाहीर केले आहे.
याविषयी अधिक माहिती साठी संजय शिंदे (९८५०९०९१४९), नरेंद्र कदम (९८२२३७०६८८), यांच्याशी संपर्क साधावा.





















Join Our Whatsapp Group