सांगवी (Pclive7.com):- पिंपळे गुरव मध्ये सृष्टी चौकात पवना नदी पात्रालगत असलेल्या मोकळ्या मैदानात पोलिसांनी छापा टाकून तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या तरुणांवर कारवाई केली आहे.

पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात पवना नदीच्या पात्रालगत असलेल्या मोकळ्या मैदानात (दि.०४) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याची सुमारास आरोपी ०१) देविदास शरणाप्पा सूर्यवंशी (वय ३६ रा. विकास नगर हनुमान मंदिराजवळ कासारवाडी), ०२) सुरेंद्र राजू भोजने (वय ३१ रा. हनुमान नगर भगत वस्ती भोसरी), ०३) चित्रसेन भगवान घरवाढवे (वय ३३ रा. गणेश नगर वैदु वस्ती पिंपळे गुरव),

०४) प्रशांत राम बडी (वय २३ रा. गणेश नगर वैदु वस्ती पिंपळे गुरव), ०५) गणेश मनोहर हुंबरे (वय २८ रा. गणेश नगर वैदु वस्ती पिंपळे गुरव) हे तीन पत्ती जुगार पैसे लावून खेळताना आढळून आले. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद गोडे यांनी या ठिकाणी छापा टाकून ९ हजार ५४० रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात या पाचही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार एस.डी. ढवळे पुढील तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group