आळंदी (Pclive7.com):- आळंदी शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राम मंदिर व माऊलींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्री राम जन्मोत्सव निमित्त माऊलीं मंदिरात सकाळी 10 ते दु.12 या वेळेत ह भ प संतोष मोझे यांच्या वतीने ह भ प शरद महाराज बंड यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त हजारो भाविकांनी सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला.

श्री राम जन्मोत्सव वेळी हजारो भाविकांनी पुष्पवृष्टी केली.आज श्री रामनवमी निमित्त दुपारी 2:30 ते 6 या वेळेत माऊलीं मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी वर शिंदे शाही पगडी चे चंदन उटीचे रूप साकारण्यात येणार आहे.

श्री राम प्रभू यांच्या पालखीची पूजा व आरती सायंकाळी 5 ते 6 यावेळेस संपन्न होणार आहे. तसेच आळंदीतील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.























Join Our Whatsapp Group