चिंचवड (Pclive7.com):- सुदर्शन नगर येथील येथील श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने चिंचवड मधून तीर्थंकर भगवंतांची शोभयात्रा काढून भगवान महावीर जन्म कल्याणक उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात अभिषेक, महापूजा करण्यात आली.

यावेळी भगवान तीर्थन्कर भगवंताची शोभायात्रा सुदर्शन नगर, चिंचवड, पिंपरी लिंक रोड या मार्गाने काढण्यात आली. गावडे पेट्रोल पंपा जवळून पुन्हा मंदिरात सांगता करण्यात आली. या शोभयात्रेत बँड पथक, शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ३०० भाविक सहभागी झाले होते. फेरी दरम्यान त्रीशलाका नंदन वीर कि, जय बोला महावीर कि,मानवी आहार शाकाहारी आहार, वीरा वीरा जय महाविरा, जियो और जिने दो अशा जयघोष केला.

यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांनी रक्तदान केले. तर जीवदया साठी सुमारे एक लाख रुपये देणगी देण्यात आली अशी माहिती ट्रस्टचे विश्वास्तांनी दिली.






















Join Our Whatsapp Group