पिंपरी (Pclive7.com):- प्रेमप्रकरणातून एका मुलीला पळवून नेले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांचे अपहरण केले. ही घटना मारुंजी येथे घडली. दिनेश रामनाथ चव्हाण (२५, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अक्षय राठोड, अंकुश राठोड, संदीप राठोड, उमेश राठोड व त्यांचे सात साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आरोपी मारुंजीतील अक्षय निवास, सरकार चौक येथे आरोपी एका गाडीतून आले, त्यांनी आमच्या मुलीला तुझा भाऊ निलेश याने पळून नेले आहे. त्यांना आणून दे आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा, असे म्हणत फिर्यादी व त्यांचे वडील रामनाथ यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, आमच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला जीवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. फिर्यादीचे वडील रामनाथ यांना जबरदस्तीने अपहरण करून नेले. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहे.






















Join Our Whatsapp Group