हिंजवडी (Pclive7.com):- हिंजवडी व वाकडचे ग्रामदैवत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणूकीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पारंपारिक पद्धतीने बगाड मिरवणुकीत उत्साह पहायला मिळाला. बगाड मिरवणूकीत यंदा म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी हिंजवडी, वाकडसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बगाड मिरवणूक पहायला मोठी गर्दी केली होती.

यंदा शनिवार दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हलगी तुतारीच्या कडाडणाऱ्या आवाजात, भंडाऱ्याची उधळण करत बगाड मिरवणूक सुरु झाली. यावेळी सहभागी ग्रामस्थांनी पैस.. पैस.. म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा एकच जयघोष करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान, प्रथेप्रमाणे हिंजवडी गावठाण येथील होळी पायथा मैदानात बगाडाचे मानकरी आणि ग्रामस्थ एकत्र आले. परंपरेनुसार गळकरी होण्याचा मान जांभूळकर वाड्यातील यंदा गळकरी म्हणून सोमनाथ सखाराम जांभुळकर यांची निवड घोषित करण्यात आली. साखरे यांनी गळकऱ्याला गळ टोचला गणेश साखरे आणि सुरज साखरे यांना यंदा खांदेकरी होण्याचा मान मिळाला.

सायंकाळी पाचच्या सुमारास खांदेकरऱ्यांनी गळकऱ्याला होळी पायथा मैदानावर आणले आणि कडाडणाऱ्या हलगीच्या आवाजात पैस पैस .. म्हातोबाच्या नावानं चांगभलंच्या एकच जयघोष करत बगाड मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाड हिंजवडी गावठाण, कस्तुरी चौक, भुमकर वस्ती, केमसे वस्ती, वाकडकर वस्ती, भुजबळ वस्तीमार्गे वाकड गावामध्ये दाखल झाले. बगाड मार्गावर जागोजागी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सरबत, थंडगार पाण्याची सोय कारण्यात आली होती. वाकड मधील म्हातोबाच्या मंदिरात बगाड मिरवणुकीची पारंपारिक पद्धतीने सांगता करण्यात आली. यावेळी हिंजवडी व वाकड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.






















Join Our Whatsapp Group