पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत असलेल्या ग प्रभागातील प्रभाग क्रमांक २७ मधील सप्तशृंगी मेडिकल शेजारून जाणारा रस्ता शेवटी बंद करून सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम काहींनी चालु केले आहे. हा रस्ता तात्काळ नागरिकांसाठी मोकळा करण्यात यावा अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केले.
युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जवळपास चाळीस वर्षांपासून हा रस्ता नागरिक दळणवळणाकरिता वापरत आहेत. यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापत्य प्रशासनाने करोडो रुपये खर्च केले आहे. तरी हा रस्ता लोखंडी खांब लावुन बंद केला आहे.

आपण पुढील पाच दिवसात हा रस्ता नागरिकांच्या दळणवळणाकरिता खुला न केल्यास तेथील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल. या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group