पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयातील इंटरनेट सेवा आज (दि.१७) सकाळी अचानकपणे बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
आज सकाळपासूनच वायसीएम रुग्णालयातील इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. त्याचा मोठा फटका येथे ऍडमिट होणाऱ्या रुग्णांना तसेच ओपीडीत उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सोसावा लागत आहे. ऍडमिट होण्यासाठी तसेच ओपीडीत उपचारासाठी नोंदणी करणे गरजेचे असते. इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे ऍडमिशन अभावी रुग्णांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी. पुन्हा अशाप्रकारे इंटरनेट सेवा ठप्प पडणार नाही याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

शहरातील आमदारांचे वायसीएमकडे पूर्णपणे दुर्लक्ष..
पिंपरी चिंचवड वासियांसाठी वरदान असलेले वायसीएम रुग्णालय सध्या रामभरोसे आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे केवळ प्रशासनाकडून या रुग्णालयाचा गाडा हाकला जात आहे. शहरातील आमदारांचा प्रशासनावर म्हणावा असा वचक राहिला नाही. सत्ताधारी केवळ मोठमोठे प्रकल्प आणण्यात व्यस्त आहेत. गोरगरिबांच्या मूलभूत प्रश्नांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य कडून केला जात आहे.























Join Our Whatsapp Group