पुणे (Pclive7.com):- जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात आत्तापर्यत ३० पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ६ जण (डोंबिवलीमधील ३ आणि नवी मुंबईतील १ आणि पुण्यातील २) पर्यटक दगावले आहेत. त्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांशी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काला फोनवरून संवाद साधला होता. आज संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील एकूण ६ जणांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. जगदाळे आणि गणबोटे या दोघांचं पार्थिव आज पुण्यात आणलं जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती…
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी १२.१५ वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. ६ वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.१५ वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल. मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर…
मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे. पहलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ल्यात पुणे जिल्ह्यातील आपल्या माहितीतील कोणी व्यक्ती असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा प्रशासन संपर्क क्रमांक-
020-26123371
9370960061,
8975232955,
8888565317
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर
0217 2731012
शक्तीसागर ढोले- +919822515601
मदनसिंग परदेशी- +919823065090
अरविंद चौगुले- +919359397524