पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड आणि पुणे यांच्या सीमेवर असलेल्या मुळा मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद करत नदी भोवताली असलेले वृक्ष संपदा तोडण्यात येत असल्याचा आरोप करत आज हजारो पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले. विकासाच्या नावाखाली शहरातील सर्वच नद्यांची पात्र अरुंद केली जात असून नद्यांच्या भोवताली असलेली वृक्षसंपदा तोडण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या नदी सुधार प्रकल्पाविरुद्ध पर्यावरणप्रेमी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (दि.२७) पिंपळे निलख येथे ‘नदीसाठी नदीकाठी’ आंदोलन होत आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ११० पेक्षा अधिक संस्था-संघटना सहभागी झाल्या आहेत.

मागील दोन महिन्यांपासून शहरात नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. यापूर्वी मानवी साखळी, निवेदन, लाक्षणिक उपोषण पर्यावरणप्रेमी संघटनांनी केले. त्यानंतर आता ११० पेक्षा अधिक संघटनांनी एकत्रित येत आज पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामठे उद्यानापासून स्मशानभूमीपर्यंत नदीकाठी पदयात्रा काढण्यात आली. या आंदोलनाला ‘नदीसाठी नदीकाठी’ असे नाव देण्यात आले आहे. आता पर्यावरण प्रेमींच्या या भूमिकेनंतर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.























Join Our Whatsapp Group