पिंपरी (Pclive7.com):- बँकेने सील केलेल्या दुकानाचा दोघांनी मिळून अनधिकृतपणे ताबा घेतला. बँकेने लावलेले सील आणि कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. ही घटना ९ एप्रिल रोजी पूर्णानगर चिखली येथे उघडकीस आली. याप्रकरणी बँक ऑफ बडोदा भिवरी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत केशव बोराडे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, प्रवीण दत्तात्रय कोकाटे (५०, मोरेवस्ती, चिखली) आणि महिला (४२) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण कोकाटे याचे पूर्णानगर चिखली येथे शांतीसदन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये एक दुकान आहे. त्यासाठी त्याने बँक ऑफ बडोदा भिवरी शाखेतून कर्ज घेतले होते.

कर्जाची वेळेवर परतफेड न केल्याने बँकेने कारवाई केली. बँकेकडून दुकानाला सील केले. बँकेची कारवाई झालेली असतानादेखील आरोपींनी सील आणि कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत दुकानाचा ताबा घेतला.























Join Our Whatsapp Group