पिंपरी (Pclive7.com):- महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह परदेशी गेले असल्याने बुधवार (दि. ३०) ते बुधवार (दि. ७ मे) या आठ दिवसांच्या रजा कालावधीत त्यांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे असणार आहे. त्याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी आदेश काढले आहेत.

आयुक्त शेखर सिंह फ्रान्स देशातील पॅरिस शहरामध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. त्याबाबत त्यांनी नगरविकास विभागाकडे रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसार आयुक्त सिंह हे ३० एप्रिल ते ७ मे या कालावधीत पर्यटनासाठी सुट्टीवर आहेत.
या कालावधीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे हे पालिकेचा कार्यभार सांभाळणार आहे. दरम्यान, नदीसुधार प्रकल्प, धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटीसींमुळे आंदोलने सुरू आहेत. तसेच पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. असे असताना आयुक्त पर्यटनासाठी गेल्याने चर्चा रंगली आहे.