पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन तसेच कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शहरवासीयांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सह शहर अभियंता संजय खाबडे, नितीन देशमुख, उप आयुक्त विठ्ठल जोशी, आण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, पंकज पाटील, मनोज लोणकर, संदीप खोत, राजेश आगळे,सहाय्यक आयुक्त अविनाथ शिंदे, उमेश ढाकणे, निवेदिता घारगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, तसेच विविध विभागातील महापालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.