पिंपरी (Pclive7.com):- पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवले. या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाच नावं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे चार वाजता ही घटना घडली. मर्सिडीज कार वेग अधिक होता. कारची थेट दुचाकीला धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे. कायदेशीर सर्व प्रक्रिया पार पडली जात आहे. अशी माहिती उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. तसेच, या अपघात प्रकरणी कोणतीही चुकीची माहिती पसरवली जाऊ नये असे आवाहनही उपायुक्त संभाजी कदम केलं आहे.
घटनास्थळावरील नागरिकांचा दावा आहे की, मर्सिडीज चालवणारे आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. पोलिसांनी या दाव्याची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.