पिंपरी (Pclive7.com):- चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांना पोलीस दलातील उत्कृष्ठ सेवेबद्दल पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने त्यांना “शौर्य पुरस्कार” देऊन चिखली पोलीस स्टेशन येथे गौरविण्यात आले.
यावेळी संस्थापक, अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख विनायक जगताप, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष विजय महाजन, संत तुकाराम नगर विभाग अध्यक्ष केशव त्रिभुवन, उपाध्यक्ष रविकांत सागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
