पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत लाईटच्या खांबाचा शॉक लागून चार श्वानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी येथील कामगारनगर या ठिकाणी महानगरपालिका व एमएनजीएल यांचे काम चालू आहे. येथील पथदिव्याच्या खांबाचा शॉक लागून चार निरपराध श्वानाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चुकीच्या कामामुळे या मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला असून याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काही दिवसापूर्वी पिंपरी गाव येथील वैभव नगर परिसरातील एका डीपी बॉक्सचा शॉक लागून एका गाईचा मृत्यू झाला होता.