पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील पिंपरी चिंचवड महापालिकेचा दवाखाना व तालिम अत्याधुनिक सुविधांसह नव्याने उभारण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

नाना काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ रहाटणी-सौदागर परिसरातील नागरिकांसाठी महापालिकेचा वतीने दवाखाना बांधण्यात आला असून, तो सध्या खूप जुना झाला आहे. सध्या नागरिकांसाठी या दवाखान्यातील जागा देखील अपुरी पडत आहे. याच दवाखान्यात नागरिकांना बसण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेडची उभारणी देखील केलेली आहे. तसेच लहान मुलांसाठी या दवाखान्यात लसीकरण देखील चालू असते. त्यावेळी देखील नागरिकांची मोठी गैरसोय होते.
तसेच पिंपळे सौदागर गावत अनेक कुस्ती, कबड्डी व विविध खेळातील खेळाडू आहेत. त्यांना व्यायाम सराव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तालीम व जिम बांधण्यात आलेली आहे. या तालमीची देखील वारंवार दुरुस्ती व डागडुजी करण्यात आलेली असून ती सुद्धा सध्याच्या काळात जुनी व जीर्ण झालेली आहे. या दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चलर ऑडिट करून त्याठिकाणी अत्याधुनिक सुविधांसह नव्याने इमारती बांधण्याची सध्या गरज आहे.
तरी महापालिका आयुक्त यांनी पिंपळे सौदागर मधील महापालिकेचा दवाखाना आणि तालिम या दोन्ही वास्तुंचे स्ट्रक्चलर ऑडिट करून नवीन आत्याधुनिक सोयी सुविधायुक्त दवाखाना व तालिम उभारावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group