पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २९ मे ते शनिवार दिनांक ३१ में २०२५ असा तीन दिवसीय जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात जयंती महोत्सव समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे.

जयंती महोत्सवानिमित्त गुरुवारी खेळ रंगला पैठणीचा हा खास महिलासाठीचा कार्यक्रम, यशोगाथा अहिल्यादेवींची हा शाहिरी कार्यक्रम महानृत्य पुण्यश्लोक सादर केले जाणार आहे. शुक्रवारी महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा स्पर्धा, सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव कार्यक्रम, प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. शनिवारी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य जयंती दिंडी यात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता सांगवी स्मारक या ठिकाणी गजनृत्य हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सकाळी १०.३० वाजता सांगवी येथील स्मारकास आणि ११ वाजता मोरवाडी पिंपरी येथील स्मारकास आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल.
यावेळी जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा विणा सोनवलकर, समिती सदस्य माजी नगरसेवक राजू दुर्गे, अशोक खरात, महावीर काळे, धनंजय ताणले, गणेश खरात, पोपट हजारे, सचिन सरक, नरेंद्र चऱ्होटे, बाबीर मेटकरी, अजय दूधभाते, नवनाथ भिडे, विठ्ठल देवकाते, बिरू व्हनमाने, दत्ता मोसळगी, बापू गडदे, शुभम महानोर, नितीन इंगळे, अनिकेत गावांडे, विजय बुरुंगले, राहुल मदने, रेखा दुधभाते उपस्थित होते.