पिंपरी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, यांच्या आषाढी वारी निमित्त आळंदी ते पंढरपुर पायीवारी पालखीचे प्रस्थान दिनांक १९/०६/२०२५ रोजी तसेच दिनांक १८/०६/२०२५ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी निमित्त देहुगाव ते पंढरपुर असे प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आळंदी, देहु येथे आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी दौरा करुन आढावा घेतला.

यावेळी आषाढी पायीवारी निमित्त आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी, व संत तुकाराम महाराज, देहु व आजुबाजूचा परिसर, पालखी मार्ग यांची पाहणी केली. सदर प्रसंगी वाहतुक व्यवस्था पार्किंग, गर्दीचे नियोजन, मनुष्यबळाचा योग्य वापर, वारकरी यांची सुरक्षा व्यवस्था, तसेच गुन्हेगारी नियंत्रणा करीता आवश्यक उपाययोजना, भक्तीमय, आनंददायी वातावरण व सुरक्षित व्हावे याकरिता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. शशिकांत महावरकर पोलीस सह आयुक्त, सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), विशाल गायकवाड उप आयुक्त, परिमंडळ २, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), बापू बांगर पोलीस उप आयुक्त, (वाहतुक शाखा), बाळासाहेब कोपनर सहा. पोलीस आयुक्त (देहुरोड विभाग), राजेंद्रसिंग गौर, सहा. पोलीस आयुक्त (चाकण विभाग), डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), भास्कर ढेरे सहा. पोलीस आयुक्त (वाहतूक), सतिश कसबे सहा. पोलीस आयुक्त (वाहतूक), सुनिल कु-हाडे, सहा. पोलीस आयुक्त (वाकड), विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक देहुरोड, भिमा नरके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आळंदी, बापु ढेरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिघी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group