मोशी (Pclive7.com):- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात उद्योगनगरी स्वागत झाले. विविध संस्था, संघटना, हॉस्पिटल यांच्यावतीने वारकऱ्यांची विविध प्रकारे सेवा करण्यात आली. मोशीतील विठ्ठल हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी आणि औषधोपचारचे किट वाटप करून अनोखी सेवा करण्यात आली.

निगडीतील भक्ती-शक्ती चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत शहराच्या वतीने करण्यात आले होते. या चौकात विठ्ठल हॉस्पिटलच्या वतीने तंबू उभारून वारकऱ्यांसाठी औषधोपचार, मलमपट्टी आणि पिण्याचे पाणी देऊन हसतमुखाने सेवा करण्यात आली.
मोशीत विठ्ठल नावाने सुरु केलेल्या हॉस्पिटलकडून आषाढी वारीत वारकऱ्यांची सेवा करून खऱ्या अर्थाने विठ्ठलभक्ती केल्याचे समाधान मिळाल्याची भावना किडनीतज्ज्ञ डॉ. शंकर मुंडे, एम.डी.मेडिसीन डॉ. भाग्यश्री लहाने, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. गणेश मुंडे यांनी व्यक्त केली.

घेईन मी जन्म याजसाठी देवा, पुन्हा तुझी चरणसेवा साधावया या ओळींप्रमाणे विठ्ठलभक्ती करण्यासाठी विठ्ठल हॉस्पिटच्या माध्यातून वारकऱ्यांसाठी सेवा देण्यात आली. यापुढेही सातत्याने करत राहणार आहे. भक्ती-शक्ती चौक आणि दिघी परिसरात वारकऱ्यांसाठी औषधांचे किट आणि जखम झालेल्या जागी मलमपट्टी करून सेवा दिली. वारकऱ्यांच्या माध्यमातून विठ्ठलसेवा घडल्याने मनाला समाधान मिळाले, असल्याची भावना डॉ. भाग्यश्री लहाने-मुंडे यांनी व्यक्त केली.






















Join Our Whatsapp Group