चिखली (Pclive7.com):- गावठाण परिसरात दत्तमंदीर बाजूला दफणभूमी आरक्षण असून, ते त्वरीत रद्द करून त्या जागेवर क्रीडांगण विकसित करावे अशी मागणी चिखली ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत बुधवारी (दि.९) रोजी फ क्षेत्रिय कार्यालय यथे बैठक पार पडली. यावेळी समस्थ टाळगांव चिखली ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी गावठांण परिसरात सर्वधर्मियांसाठीच्या दफणभूमीचे आरक्षण टाकण्यात आले होते. ते रद्द करून, पुन्हा ख्रिश्चन धर्मियांसाठी दफणभूमी आऱक्षण करण्यात आले. मात्र या ठिकाणी कुठलीही दफणभूमी नको, तर मुलांसाठी क्रिडांगण विकसित करावे, टाळंगाव चिखली ही संतभूमी आहे, वारकऱ्यांना वारी दरम्यान आश्रयासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कुठल्याही जाती-धर्माला आपला विरोध नाही. मात्र या ठिकाणी कुठलीही दफणभूमी न होता, मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी, क्रीडांगण, आषाढी वारी दरम्यान येणाऱ्या वारकऱ्यांना एक आश्रयस्थान असावे यासाठी सोय करावी अशी मागणी आहे.– माजी नगरसेवक कुंदन गायकवाड

चिखली परिसरात एक ही क्रीडांगण नाही, त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांची गैरसोय होते. या मुलांच्या भविष्यासाठी खेळाला महत्त्व देऊन या दफणभूमी आऱक्षणाच्या ठिकाणी क्रिडांगण व्हावे अशी आमची मागणी आहे.– जितेंद्र यादव (चिखली ग्रामस्थ)
फ क्षेत्रिय कार्यालय येथे झालेल्या बैठकीमध्ये फ क्षेत्रिय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता विजय वायकर, चिखली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंके तसेच फ क्षेत्रिय कार्यायलाचे सर्व अधिकारी यांच्यासह माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे, विनायक आबा मोरे, गणेश भूजबळ, यशवंत साने, रामदास भांगरे, गणपत आहेर, प्रदीप आहेर, विक्रम मोरे, सदानंद नेवाळे, संतोष मोरे, रोहिदास मोरे समस्थ टाळंगाव चिखली ग्रामस्थ, वारकरी-टाळकरी यावेळी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group