पिंपरी (Pclive7.com):- येत्या दहा दिवसात कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरला नाही, तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पिंपरी -चिंचवड युवासेनेकडून देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य प्रमुख सचिन पवार यांना युवासेना शहर संघटक निलेश हाके यांच्या वतीने याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत महिला कर्मचारी कंत्राटदार मे.सिंग यांच्यामार्फत पुरवले जातात. परंतु यांनी अनेक वर्षापासून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (PF) भरला नाही. कष्टाळू, गोरगरीब हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत मे. सिंग कंपनीकडून फसवणूक केली जात आहे. कंपनीच्या अनामत ठेव रकमेतून त्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाहनिधी (PF) देण्यात यावे. येत्या दहा दिवसात कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरला नाही, तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड आरोग्य प्रमुख सचिन पवार यांना युवासेना शहर संघटक निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले.






















Join Our Whatsapp Group