विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम!
पिंपरी (Pclive7.com):- समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखणे ,प्रत्येक वंचित घटकाच्या मदतीसाठी धावून जाणे ही शिवसेनेची खरी ओळख आहे. या माध्यमातून कायमच ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी यांचा आदर राखला आहे. त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करत रस्त्यावर देखील उतरलो. हीच खरी समाजसेवा मानली आणि जपली असे शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या.

पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.१३ यमुनानगर येथील जेष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी महिला भगिनी यांचा सत्कार आज (दि.२४) करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुलभा उबाळे बोलत होत्या.

उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन युवासेना – पुणे जिल्हा (शिरूर लोकसभा) अध्यक्ष अजिंक्य रामभाऊ उबाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने छत्री वाटप करण्यात आले.


सुलभा उबाळे पुढे म्हणाल्या शिवसेना ही सर्वसामान्य जनतेसाठी झटणारी आहे. कोणत्याही वंचित घटकावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर देखील उतरायला मागे हटत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा विश्वास शिवसेने सोबत आहे. हाच विश्वास कायम ठेवत पुढील काळात काम करायचे असल्याचे उबाळे यांनी स्पष्ट केले.



























Join Our Whatsapp Group