पिंपरी (Pclive7.com):- निगडीहून देहूकडे जात असताना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या निदर्शनास एक अपघाताची घटना आली. हॉटेल पुणे गेट समोरील रस्त्यावर एक रिक्षा पलटी झालेली दिसताच त्यांनी त्वरित गाडी थांबवली आणि मदतीसाठी धाव घेतली.

सविस्तर वृत्त असे की, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले हे कामाच्या निमित्ताने देहूकडे जात असताना हॉटेल पुणे गेट समोरील रस्त्यावर त्यांना एक रिक्षा (MH-14 KU-7411) पलटी झालेली दिसली. या रिक्षामध्ये एक महिला व रिक्षाचालक अडकले होते. घटनास्थळी लोकांची गर्दी जमत असतानाच सचिन चिखले यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पुढाकारामुळे व नागरिकांच्या मदतीने रिक्षाचालक व जखमी महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सदर जखमींना तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. सचिन चिखले यांच्या या माणुसकीच्या आणि संवेदनशीलतेच्या कृतीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि मदतीचा हात ही समाजासाठी प्रेरणादायी बाब ठरत आहे.






















Join Our Whatsapp Group