पिंपरी (Pclive7.com):- सकाळपासून पवनाधरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पवना धरण १०० टक्के भरलेले असून आज (दि.१९) सायंकाळी ६ वाजल्यापासून नदीपात्रात एकूण ११,९०० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

यामध्ये जलविद्युत केंद्राद्वारे १४०० क्युसेक्स व सांडव्याद्वारे १०,५०० क्युसेक्स पाणी सोडले आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस बरसत असल्याने आज (दि.१९) सकाळी १० धरणातून होणारा विसर्ग वाढवून ४३०० क्युसेक्स करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी ३ वाजता ७१६० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता सायंकाळी सहा वाजल्यापासून धरणातून ११,९०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरणातून होणारा विसर्ग पावसाच्या तीव्रतेनुसार टप्प्याटप्प्याने कमी-जास्त केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे, तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group