पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्वे नं.३९ विकासनगर, किवळे येथे येथे सांस्कृतिक भवन, लायब्ररी, उद्यान व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवासेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

राजेंद्र तरस यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, विकासनगर किवळे येथील सर्वे नं.३९ येथे के. टाउन या प्रोजेक्टमध्ये विकासाने BP/kiwale/27/2024 ॲमेनीटी ओपन एरिया 1694.65 sq mtr ही जागा सोडलेली असून सदर जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली आहे.

त्यामुळे त्या भागातील जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व तरुणांना त्याचा फायदा होईल. त्या भागातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सदर जागेवर विकासनगर, किवळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी सांस्कृतिक भवन, लायब्ररी, उद्यान व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

राजेंद्र तरस यांनी केलेल्या मागणीला आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच विकासनगर वासियांसाठी सांस्कृतिक भवन, लायब्ररी, उद्यान व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उपलब्ध होईल असा विश्वास राजेंद्र तरस यांनी व्यक्त केला आहे. तसेच या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस आणि माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ हेही आग्रही आहेत.






















Join Our Whatsapp Group