

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या रहाटणी मधल्या एसएनबीपी स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कराटे इंडिपेंडंस कप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एसएनबीपी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धा शत्रुघ्न काटे स्पोर्ट्स ने आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धांमध्ये रहाटणी आणि पिंपळे सौदागर मधील विविध कराटे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विविध वयोगटांच्या स्पर्धांचे आयोजन एसएनबीपी स्कूलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सर्वच कराटे खेळाडूंनी दमदार कामगिरी करत कौशल्य दाखविले आहे. या स्पर्धांमध्ये एस एन बीपी स्कूलने घवघवीत यश मिळवत सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्याचा बहुमान मिळवला.

या स्पर्धेसाठी एसएनबीपी स्कूलचे अध्यक्ष डी.के. भोसले आणि जयश्री व्यंकटरमण यांनी मार्गदर्शन केले. एसएनबीपी स्कूल मधील सुमित थापा यांनी स्पर्धांच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशा बद्दल एसएनबीपी स्कूल कडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.























Join Our Whatsapp Group