
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील मित्र सहकार्य तरूण मंडळाचा बाप्पा नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. मंडळाचे यंदाचे हे ६१ वे वर्ष असून प्रथेनुसार या मंडळाच्या बाप्पाचे पारंपारिक वाद्य ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले.

पिंपरी गाव येथील हॉटेल गणेश येथून या नवसाच गणपतीची मिरवणूक बुधवारी सायंकाळी सहा वाजता सुरु झाली. आदियोगी रथ हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. या मिरवणुकीत पारंपारिक वाद्य ढोल ताशाचे भोसरी येथील स्वराज्य पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंडळाने प्रथेनुसार यंदाच्या वर्षी देखील मिरवणूकीत डॉल्बी, डिजेला फाटा देत पारंपारिक पध्दतीच्या ढोल ताशांचा वापर केला. ही मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यंदा चार मंडळांचा संयुक्त आगमन मिरवणूक सोहळा
पिंपरी गाव येथे यंदाच्या वर्षी प्रथमच गणेश मंडळांची संयुक्त मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये मित्र सहकार्य तरुण मंडळ, उज्वल मित्र मंडळ, ज्योती मित्र मंडळ आणि प्रताप मित्र मंडळ यांनी एकत्रित येत संयुक्त असा मिरवणूक सोहळा आयोजित केला होता. या चारही मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक पार पाडली.
