
पिंपळे निलख (Pclive7.com):- गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, परिसरातील पिंपळे निलखचा विघ्नहर्ता श्री गणेश मित्र मंडळ ट्रस्ट गणेश नगर औंध कॅम्प पुणे २७ येथे बाप्पांचे आगमन आनंदात व प्रसन्न वातावरणा मध्ये व अतिशय भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले.

सोहळ्या वेळी मंडळाचे आधारस्तंभ प्रकाश बालवडकर, मंडळाचे अध्यक्ष सागर साठे पाटील, उपाध्यक्ष देविदास भोर, उपाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव समिती अध्यक्ष स्वप्नील सोनवणे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह व भक्ती भावाने भरलेल्या या आगमन सोहळ्यात वातावरण गणेशमय भक्ती मय झाले होते.

श्री गणेशा ढोल ताशा पथकाच्या दमदार वादनाने सोहळ्याला विशेष उत्साह वाढला. दणदणाटी तालावर भक्तांनी बाप्पांना वंदन केले आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला.

यंदा मंडळाने साकारलेला देखावा विशेष आकर्षण ठरत आहे. ‘बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित हा देखावा भाविकांच्या दर्शनासाठी मांडण्यात आला असून, कार्यकर्त्यांनी त्यास अत्यंत भक्तिपूर्वक व कलात्मकतेने सिद्ध केले आहे.

लक्षवेधी बाब म्हणजे, यंदाचे वर्ष हे मंडळाच्या स्थापनेचे ४१ वे वर्ष आहे. चार दशकांहून अधिक काळापासून पिंपळे निलख मध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये योगदान देणारे हे मंडळ आहें आजही परिसरातील गणेश भक्तांसाठी एक विश्वासाचे व आकर्षणाचे केंद्रस्थान ठरले आहे.
गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मंडळातील महिला कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने उत्सवाला मोठ्या प्रमाणावर रंगत आली आहे. भाविक आता दरवर्षी प्रमाणेच बाप्पाच्या मिरवणुकी पासून ते देखाव्यापर्यंत सर्वच उपक्रमांची आतुरतेने वाट पाहत आहेत.






















Join Our Whatsapp Group