
पिंपरी (Pclive7.com):- गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषात.. श्रीकृष्ण रथात विराजमान होऊन शिवनीती ढोल ताशा पथकाच्या गजरात पिंपरी गावच्या राजाचे आगमन झाले.

५४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ज्योती मित्र मंडळाचा गणपती बाप्पा “पिंपरी गावचा राजा” म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यंदा मंडळांने भव्य मिरवणूक काढत गणपती बाप्पांना विराजमान केले. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण विद्युत रोषणाई केलेला भव्य श्रीकृष्ण रथ होता. त्याचबरोबर शिवनीती ढोल ताशा पथकाच्या दणदणाटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पिंपरी गाव येथील हॉटेल गणेश येथून ज्योती मित्रमंडळापर्यंत ही भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.

या वेळेस मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक संतोष कुदळे यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्व वर्गणीदार हितचिंतक हे उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी मंडळाने गडकोट किल्ले संवर्धन हा पारंपरिक व ऐतिहासिक देखावा सादर केला असून हा देखावा सर्व गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.
