
मोशी (Pclive7.com):- मोशी येथे लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी 24 ऑगस्ट रोजी मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोशीतील रामकृष्ण लॉन्स मध्ये हा सोहळा पार पडला, पुरोगामी विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करीत हल्ली दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चालले आहे. परंतु कविता आल्हाट यांच्या माध्यमातून महिलांना मंगळागौरी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कविता आल्हाट म्हणाल्या की, महिलांना महिलांच्या रोजच्या धकाधकी जीवनातून बाहेर येऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी मंगळागौरीचे कार्यक्रम आम्ही सादर करत असतो, यामुळे महिलांच्या जीवनात अमुलाग्रह बद्दल होताना दिसतात.

यावेळी सहभागी महिलांनी आपली पारंपारिक संस्कृती जपवणूक करून वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून मंगळागौर सादर केली. त्याचबरोबर मजेशीर उखाने, घेऊन हास्यकल्लोळ करीत कार्यक्रम पार पडला. पारंपारिक खेळाबरोबर महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देखील या कार्यक्रमात देण्यात आला. मंगळागौर कार्यक्रमात उत्कृष्ट, नृत्य, गायन, कला खेळ पैठणीचा सादर करणाऱ्या महिलांना आकर्षित बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या.

विशेष आकर्षण म्हणून वैभव तत्त्ववादी, प्राजक्ता गायकवाड, ओम यादव
यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, प्रिया बनसोडे, वसंत बोराटे, गणेश सस्ते, संदेश आल्हाट, आतिष बारणे, निलेश जाधव, विशाल जाधव, प्रकाश गव्हाणे, संतोष सस्ते तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या.
