पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (आयटीआय) औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) कासारवाडी येथे दि.३० ऑगस्ट २०२५ रोजी आयडियल इंटरनॅशनल इन्स्टिटयुट ऑफ एज्युकेशन या संस्थेमार्फत उद्योजकता विकास परिचय प्रशिक्षण कार्यक्रम २०२५ अन्वये “नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा” हा महिला प्रशिक्षणार्थीकरिता कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. या कार्यक्रमास श्री.गोविंद पानसरे, श्री. टंकसार, श्री. फुलारे, श्री. जगदाळे, श्री. सपकाळ सर याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

यामध्ये प्रशिक्षणार्थीनींना सरकारी योजना, स्वयंरोजगार, विवध प्रकारचे व्यवसायाविषयक मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य श्री. ज्योत सोनवणे, श्रीम. कुमावणी मनसरा निदेशक, श्री. सिध्दार्थ कांबळे, निदेशक, श्रीम. हेमाली कोंडे निदेशक, श्रीम. वंदना चिंचवडे निदेशक, श्रीम. सोनाली निलवर्ण निदेशक यांची उपस्थितीत होती. सदर प्रशिक्षण आम्हांला स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी खूप मोलाचे वाटते, अशा भावना प्रशिक्षणार्थीनींनी व्यक्त केल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) कासारवाडी येथे दिनांक २ सप्टेबर २०२५ रोजी ऑगस्ट २०२५ – २६ या सत्रातील प्रवेशित प्रशिक्षणार्थीच्या स्वागता करिता मा. श्रीम. दुर्गाताई भोर, अध्यक्षा दुर्गा ब्रिगेड भासरी व महिला लघु उद्योजक, पिं.चिं.मनपा यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी श्रीम. दुर्गाताई भोर यांनी महिला प्रशिक्षणार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. तद्ननंतर प्रशिक्षणार्थी भेट वस्तु देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य श्री. ज्योत सोनवणे, श्रीम. कुमावणी मनसरा निदेशक, श्री. सिध्दार्थ कांबळे, निदेशक, श्रीम. हेमाली कोंडे निदेशक, श्रीम. सोनाली निलवर्ण निदेशक, श्रीम. बबिता गांवडे निदेशक यांची उपस्थिती होती.


















Join Our Whatsapp Group