पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते.

मागील ९ वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे. यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते.

या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण 4893 मूर्ती दान करण्यात आल्या.























Join Our Whatsapp Group