पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४० गणेश मंडळांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात, लेझर बीम लाईटचा वापर करून पोलिसांनी काढलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एकूण ४० मंडळांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात वाकड १७, पिंपरी ०८, निगडी ०५, सांगवी ०५, दापोडी ०३, तळेगाव दाभाडे ०२ या पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणा संबंधात या कालावधीत मोठ्या प्रमाणात नॉईज लेवल मीटर या उपकरणाद्वारे आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी ध्वनीच्या पातळीची मोजणी करण्यात आलेली आहे. त्याबाबत संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.























Join Our Whatsapp Group