मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पिंपरी (Pclive7.com):- चैन स्नॅचिंग, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी पकडले आहे. आरोपीकडून ४ चैन स्नॅचिंगचे, ४ घडफोडीचे आणि १ मोटर सायकल चोरीचा असे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून ४ सोन्याचे मंगळसुत्र, १ दुचाकी सह इतर असे एकुण ६ लाख ५३ हजार १५६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गौरव अनिल सरोदे (वय २४ वर्षे, सध्या रा. रोहकल रोड, चाकण, पुणे मुळ रा त्रिवेणीनगर, निगडी, पुणे) या सराईतला पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.३०/०८/२०२५ रोजी रावेत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता, तसेच दि.०१/०९/२०२५ रोजी चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता. एका पाठोपाठ झालेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा यांना सोपविण्यात आला.

त्यानंतर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने लगातार ५ दिवस रावेत व चिखली परिसरातील महापालिका आणि खाजगी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासले. त्यावेळी रावेत येथे लाल हुडी परिधान करुन महिलेच्या गळ्यातील चैन चोरी करणारा आरोपी व चिखली येथे निळा हुडी परिधान करुन महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचुन चोरी करणारा आरोपी हा एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने हा आरोपी चाकण परिसरामध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याठिकाणी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला. सापळा लावल्याचा आरोपीला संशय आल्याने तो तेथून पळुन गेला, पोलिसांच्या पथकाने तब्बल १५ किलो मीटर पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपी गौरव सरोदे याला गुन्हा करताना तो वापरत असलेल्या टि.व्ही.एस. ज्युपीटर मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने चिखली व रावेत येथील चैन स्नॅचिंगचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हा करताना वापरलेली टि.व्ही.एस. ज्युपीटर मोटर सायकल ही तळेगाव येथून चोरी केल्याचे सांगितले.
आरोपीने जुलै महीन्यात तळेगाव दाभाडे येथे एक व रावेतमध्ये आणखीन एक चैन स्नॅचिंग केली असल्याची कबुली दिली. तसेच त्याने त्याच्या एका साथिदाराच्या मदतीने चिखली येथे १, एम.आय.डी.सी.भोसरी येथे १ व संत तुकारामनगर येथे दोन असे एकूण चार घरफोडी चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे स्वतः पुढील तपास करीत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक दतात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस अंमलदार महेश खांडे, सोमनाथ मोरे, मोहसिन आत्तार, अमोल गोरे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, नितीन उमरजकर, सुमित देवकर, पवन वाजे, समिर रासकर, अमर कदम, गणेश हिंगे, गणेश सावत, विनोद वीर, नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, ज्ञानेश्वर कौलगे, गणेश कोकणे, हर्षद कदम, औदुबर रोंगे यानी केली आहे.





















Join Our Whatsapp Group