पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२ वी योगा स्पर्धा आज बजाज ऑटो आकुर्डी यांच्या उत्साह हॉलमध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये टाटा मोटर्स, प्रीमियम ट्रान्समिशन, फोर्स मोटर्स, टीकेआयएल, बजाज ऑटो आकुर्डी, एसकेएफ, सँडविक एशिया, ५१२ आर्मी बेस, टीएमव्ही, सॉफ्टकॉन सिस्टिम्स, जेसीबी, पदमजी पेपर मिल, इन्फोसिस, वोडाफोन क्लेनेक्सझेल लाइफ सायन्स, ऑर्डिनन्स फॅक्टरी देहू रोड अशा एकूण २० कंपन्यांच्या ८० खेळाडूंनी भाग घेतला. एकूण ७ गटामधे (पुरुष व महिला) गटांमध्ये झाली. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा उत्साह नजरेत भरण्यासारखा होता.

या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय योगा खेळाडू चंद्रकांत पांगारे, स्पर्धेचे पंच व या स्पर्धेतील वरिष्ठ खेळाडू यांच्या हस्ते झाले. यावेळी अतुल काळोखे (बजाज ऑटो), सचिन कांबळे (जेसीबी), औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, खजिनदार प्रदीप वाघ, अमित कदम, संतोष शिंदे (एसकेएफ), नितीन कदम (टाटा मोटर्स), गिरीश गायकवाड (थरमॅक्स), सुयोग फुलबडवे (सिग्मा इलेक्ट्रिकल्स), दुष्यंत गायकवाड (सँडविक एशिया), मंदार कुलकर्णी टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे शशिकांत कात्रे, राजू नातू, सुदर्शन आहेर हे उपस्थित होते.

पारितोषक वितरणाच्या वेळी सेंथिलकुमार मणी (व्हाईस प्रेसिडेंट आरएनडी बजाज ऑटो) यांचे स्वागत सचिव वसंत ठोंबरे यांनी केले. यावेळी बोलताना सेंथिलकुमार मणी म्हणाले की, योगाची स्पर्धा पाहून मला अतिशय आनंद झाला. योगामुळे शरीर व मन निरोगी राहते. याचा दीर्घकाळ फायदा आपणास होतो. यावेळेस नितीन कदम व योगेश तळेकर यांनीही खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषण केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सेंथिलकुमार मणी, नितीन कदम, योगेश तळेकर, शशिकांत कात्रे, राजू नातू, गिरीश गायकवाड, दुष्यंत गायकवाड यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन चंद्रकांत पांगारे, प्रास्ताविक सचिव वसंत ठोंबरे व आभार प्रदर्शन प्रदीप वाघ यांनी केले. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन अतुल काळोखे (बजाज ऑटो आकुर्डी), औद्योगिक क्रीडा संघटनेचे वसंत ठोंबरे, नरेंद्र कदम, प्रदीप वाघ, हरी देशपांडे, विजय हिंगे यांनी केले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे डिस्ट्रिक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूटचे मोलाचे साहाय्य लाभले.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे..
१) १८ ते ३० वर्षे महिला गट :- १) जुई चंद्रकांत पांगारे ७७.७५ गुण, २) ऋतुजा पाटील ७७.२५गुण, ३)शितल गोरे ७१.२५ गुण (सर्व बजाज ऑटो)
२) ३१ ते ४० वर्षे महिला गट :- १) योगिता महाडिक (क्लेनेक्सझेल लाइफ सायन्स) ८४.५ गुण, २) प्राजक्ता कानडे, (वोडाफोन) ७७गुण, ३) अश्विनी तेलेकोणे ६६ गुण
३) १८ ते ३० वर्षे पुरुष गट :- १) विपुल भोसले (बजाज ऑटो) ७७.७५ गुण, २) अंकित गौतम (टाटा मोटर्स) ७२.५ गुण, ३) कुणाल शेटकर (टाटा मोटर्स) ६९.५ गुण
४) ३१ ते ४० वर्षे पुरुष गट :- १) प्रमोद उगले (बजाज ऑटो) १६२गुण, २) समीर म्हस्के (सँडविक एशिया) १४९ गुण, ३) सचिन पोकळे (फोर्स मोटर्स) १३४ गुण
५) ४०ते ५० वर्षे पुरुष गट :- १) अभिजीत लोखंडे (टाटा मोटर्स) ७१.५ गुण, २) हनुमंत गोरनाळे (सँडविक एशिया) ७०.५ गुण, ३) सावन केदार (बजाज ऑटो) ७० गुण
६) ५०-६० वर्षे पुरुष गट :- १) एम.बी.वाळुंज (टाटा मोटर्स) ७७ गुण, २) सुभाष शिंगोटे (बजाज ऑटो) ७७ गुण, ३) हेमंत पवार (टाटा मोटर्स) ७२.५ गुण
७) ६० वर्षे पेक्षा अधिक पुरुष गट :- १) चंद्रकांत पांगारे (बजाज ऑटो) १७५ गुण, २) गोविंद शिरोळे (बजाज ऑटो) १५६ गुण.






















Join Our Whatsapp Group