गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस वितरण; महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय संस्कृती, सण, समारंभ यांना ऐतिहासिक परंपरा आहे. गणेश उत्सवाच्या माध्यमातून तर स्वातंत्र्याचा लढा उभारला गेला. नागरिकांमध्ये जागृती करण्याचे काम या उत्सवांनी केलेले आहे. नव्या पिढीत एकजूट आणि सामाजिक बांधिलकीची भावना या उत्सवातूनच निर्माण होते. असे मत शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी व्यक्त केले.

शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे आणि युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख अजिंक्य उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शाखा प्रभाग 13 यमुनानगर आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा 2025 चे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी सुलभा उबाळे बोलत होत्या.

या कार्यक्रमास भोसरी विधानसभा महिला संघटिका शशिकला उभे, शिवसेना नेते अंकुश जगदाळे, तसेच गणेश इंगवले, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील गजानन ढमाले, भगवान श्राध्ये, विजय मोगरे, अरुण बांद्रे नयना पारखे, भारती चकवे, संगीता टुपके, ममता कदम, युवा सेनेचे अनिकेत येरुणकर, प्रिया जपे, किरण वाडकर, कावेरी परदेशी, आप्पा काळोखे, कौस्तुभ गोळे, सार्थक दोषी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अमित शिंदे आदी उपस्थित होते

या प्रसंगी बोलताना सुलभा उबाळे यांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे आपली पारंपरिक संस्कृती जपली जाते. तसेच नव्या पिढीत एकजूट आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते म्हणूनच अशा स्पर्धा वेळोवेळी आयोजित होणे गरजेचे आहे

कार्यक्रमास प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या.






















Join Our Whatsapp Group