चाकण (Pclive7.com):- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह (PMRDA) इतर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गेल्या आठवड्याभरात चाकण परिसरातील एकूण ३४७ अनाधिकृत बांधकामे हटवण्यात आली. यासह ५१ होल्डिंगही काढण्यात आले. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी संबंधित कारवाई करण्यात आली.

संबंधित रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग यांनी दिलेल्या मार्किंगनुसार प्रस्तावित आहेत. त्यानुसार या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली.

विशेषतः, सार्वजनिक सुरक्षितता व वाहतूक सुलभतेसाठी अडथळा ठरणाऱ्या ५१ अनधिकृत होर्डिंगज हटवण्यात आली आहेत. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते अधिक सुरक्षित होत आहेत.

या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे चाकण परिसरातील रस्त्यांची रुंदी वाढून वाहतूक कोंडी कमी होणार आहे, तसेच अनधिकृत होर्डिंगज हटवल्याने नागरिकांना अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध वातावरण लाभणार आहे.






















Join Our Whatsapp Group