पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का? या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी वाघेरे यांच्या निवासस्थानी दिलेली भेट आणि आज राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमांतर्गत संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे आणि मुलगा ऋषिकेश वाघेरे यांची अजित पवार यांनी भेट घेतली. या भेटीमुळे संजोग वाघेरे यांच्या राष्ट्रवादीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

दरम्यान प्रसार माध्यमांची बोलताना अजितदादा पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे. संजोग वाघेरे पक्षात येणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल उत्तर दिले. संजोग उबाठामध्ये आहे, उषा आमच्या बरोबर आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा मिश्किल सवाल अजित पवारांनी केला. संजोगला ती विचारसरणी पटली म्हणून तो तिकडे आहे, उषा वाघेरे यांना माझी विचारसरणी पटली म्हणून ती माझ्या बरोबर आहे. असं अनेकांच्या घरात आहे, खूप उदाहरण देता येतील आमच्या सहित खूप उदाहरण देता येतील असं उत्तर अजित पवारांनी देताच एकच हशा पिकला.

अजितदादांनी दिलेल्या या मुश्किल उत्तरामुळे तूर्तास तरी संजोग वाघेरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार नाही असेच संकेत मिळत आहेत. मात्र असे असले तरी ऐंन निवडणुकीच्या तोंडावर संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. आता खरंच संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार की महापालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






















Join Our Whatsapp Group