

पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथे दोन व्यक्तींना बेकायदेशीररित्या एमडी (मेफेड्रोन) पावडर बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२३ सप्टेंबर) दुपारी वाकड येथील रोलेक्स रोड, पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मल्ला राम (२१, वडगाव मावळ) आणि जमीर खान भिकू खान (३२, थेरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप गवारी यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित प्रवीण याच्याकडे एक लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीची ११.८४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर आणि पंधरा हजार रुपये किमतीचा एक मोबाइल फोन सापडला. तसेच, संशयित जमीर खान याच्याकडे ८४ हजार १९० रुपये किमतीची ९.१४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर आणि २० हजार रुपये किमतीचा एक मोबाइल फोन आढळला. दोन्ही संशयितांनी संगनमत करून एमडी (मेफेड्रोन) पावडर बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगल्याचे निष्पन्न झाले.


























Join Our Whatsapp Group