

पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी निगडी मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रो ठेकेदाराकडून पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तरी त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर व ठेकेदार ह्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन ह्यांनी शहरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यात येणार म्हणून आश्वासन दिले होते. आजतागायत शहरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यात येत नाही.

धरण १०० टक्के भरले असून सुद्धा शहरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यात येत नाही. आणि दुसरीकडे मेट्रो रेल्वे प्रकल्प ठेकेदार गेल्या अनेक दिवसांपासून निगडी भागात काम सुरू असलेल्या ठिकाणी पाईप लाईन फोडून हजारो लिटर पाणी वाया घालवत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून कारवाई करत नाही त्यामुळे आयुक्त शेखर सिंह संशयास्पद भुमिका घेत आहेत असा आरोपही सचिन काळभोर यांनी केला आहे.


























Join Our Whatsapp Group