

पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे प्रखर विचारवंत व एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कुदळवाडी येथे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव जनसंपर्क कार्यलय येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात दीनदयाळजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना दिनेश यादव म्हणाले की, “पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला ‘एकात्म मानवतावाद’ हा विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरतो. त्यांच्या कार्यातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय व विकास पोहोचविण्याचा आदर्श समोर ठेवला आहे. त्यांचा विचार आणि जीवनदृष्टी आपण प्रत्येक कार्यात उतरविण्याचा संकल्प या जयंतीनिमित्त करायला हवा.”

या कार्यक्रमाला पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


























Join Our Whatsapp Group